आपल खान्देश
खडकदेवडा हिवरा धरणाच्या बंधाऱ्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू!
पाचोरा : पाचोरा तालुक्यातील जळगाव जिल्ह्यातील व औरंगाबाद जिल्ह्याच्या सीमेवर असणारा खडकदेवळा धारणाचा पातळी बंधारा पूर्ण क्षमतेने धरला आहे. त्यामुळे बंधाऱ्याच्या वरून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. सतत पाऊस सुरु राहिला तर हा विसर्ग वाढण्याची शक्यता देखील व्यक्त होत आहे.
खडकदेवळाचे हिवरा धरण पूर्ण क्षमतेने भरले pic.twitter.com/86yQIzZF9t
— ZOOM MARATHI (@DileepPardeshi) August 31, 2021
हिवरा धरण बंधारा पूर्ण क्षमतेने भरला असून बंधाऱ्याच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे प्रकल्पाच्या पाणी पातळीत अचानक वाढ झाल्याने हा विसर्ग सुरू आहे. धरणात पाण्याची आवक सुरू असल्याने खडकदेवळा धारणाचा पातळी बंधारा पूर्ण क्षमतेने धरला आहे. त्यामुळे बंधाऱ्याच्या वरून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे
त्यामुळे हिवरा नदी लगत असणाऱ्या सर्व गावांतील नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहे. कोणीहि विना कारण हिवरा नदीत उतरू नये अस्या सूचना दिल्या आहेत




