भुसावळ ते इगतपुरी नविन मेमुचे मनमाड स्थानकात भाजपाच्यावतीने जंगी स्वागत
भुसावळ ते इगतपुरी नविन मेमो रेल्वे आज पासून सुरुवात, मनमाड जंक्शन स्थानकात भाजपाच्यावतीने जंगी स्वागत
नांदगाव (प्रतिनिधी) मुक्ताराम बागुल – नांदगाव तालुक्यातील मनमाड जंक्शन रेल्वे स्थानकात भाजपाच्या वतीने भुसावळ ते इगतपुरी या नविन मेमो रेल्वेचा आज पासून प्रारंभ सुरुवात झाल्याने मनमाड जंक्शन रेल्वे स्थानकात रेल्वेचे जंगी स्वागत करण्यात आले. चाळीसगाव मनमाड ते नाशिक इगतपुरी पर्यंत रोज आणि चाकरमानी व सामान्य प्रवासी यांच्यासाठी मनमाड गोदावरी एक्सप्रेस यानंतर सेटल या गाड्या व्यतिरिक्त एकही गाडी नव्हती त्यामुळे रेल्वे सुरू होण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. भारती ताई पवार यांनी सातत्याने प्रयत्न केले. तत्कालीन केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे या समित्यांनी मागणी केली होती. याच मागणीची दखल घेत रेल्वे मंत्रालयाने 10 जानेवारी2022 रोजी सोमवारपासून आज पासून भुसावळ ते इगतपुरी पर्यंत मेमो रेल्वे सुरू झाल्यावर सुरू केली आहे. रेल्वेचे मनमाड येथील जंक्शन रेल्वे टेशन वर भारतीय जनता पार्टीच्या पक्षाच्यावतीने जंगी स्वागत करण्यात आले.

कोरोना कालावधीमध्ये पॅसेंजर रेल्वे बंद होत्या. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री आदरणीय भारतीताई पवार यांच्या माध्यमातून भुसावळ इगतपुरी हिम्मत पॅसेंजर ट्रेन (रेल्वे) सुरू झाली आहे. ग्रामीण भागातील रेल्वे प्रवाशांना मोठा असा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे आदरणीय भारतीताई पवार यांचे सर्व रेल्वे प्रवाशांत तर्फे व नांदगाव तालुक्यातील जनते तर्फे हार्दिक अभिनंदन करण्यात आले.


