आपल खान्देशब्रेकिंगमहाराष्ट्र

पाचोरा भडगावचे आमदार किशोर पाटील आणि पत्रकार संदीप महाजन यांच्यात माजी आमदार दिलीप वाघ करणार मध्यस्थी..?


पाचोरा भडगावच्या विद्यमान आमदार व पत्रकाराचा वाद त्यानंतर पत्रकार संदीप महाजन यांना अज्ञातांनी केलेली मारहाण पाचोरा भडगाव मतदारसंघाच्या राजकीय संस्कृतीसाठी हिताचे नसून येणाऱ्या काळात हा वाद विकोपाला जाऊ नये आणि शहराची व मतदार संघाची शांतता भंग होऊ नये म्हणुन या विषयाला राजकिय वळण न देता मी दोघांनाही एक- एक पाउल मागे घेऊन हा विषय मिटविण्यासाठी प्रयत्न करणार असे माजी आमदार दिलीप वाघ यांनी सांगितले.

पाचोरा भडगावच्या विद्यमान आमदार किशोर पाटिल व पत्रकार संदिप महाजन यांच्यात झालेला वाद  शिवीगाळ आणि नंतर त्या पत्रकाराला अज्ञातांनी मारहाण हे मतदारसंघाच्या राजकीय संस्कृतीसाठी हिताचे नाही. याचे महाराष्ट्र राज्यात पडसाद उमटत असून या विषयाचे आता राजकीय भांडवल केले जात आहे. मी या प्रकरणी राजकिय भांडवल करणार नाही. तसेच सदर प्रकरणात मी कोणाचाही समर्थक किंवा विरोधक पण नाही. मतदारसंघाचा एक जबाबदार माजी लोकप्रतिनिधी म्हणून दोघांतील हा वाद कोठेतरी थांबला पाहिजे ही माझी भूमिका आहे. असे पाचोरा भडगावचे माजी आमदार दिलीप वाघ यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली तसेच या संदर्भात मी आमदार किशोर पाटील यांचेशी बोलणार असून संबंधित पत्रकार यांना पण बोलावून चर्चा करणात आहे. येणाऱ्या काळात हा वाद विकोपाला जाऊ नये आणि शहराची व मतदार संघाची शांतता भंग होऊ नये म्हणुन या विषयाला राजकिय वळण न देता मी दोघांनाही एक- एक पाउल मागे घेऊन हा विषय मिटविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे माजी आमदार दिलीप वाघ यांनी त्यांच्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रसार माध्यमांच्या वतीने आवाहन केले आहे. या प्रसंगी न.पा. गटनेते संजय वाघ, खलील देशमुख, रणजित पाटील अझर खान, प्रकाश भोसले, शशी चंदिले, सुदर्शन महाजन, सुनिल पाटील, बंटी महाजन,  गोपी पाटील, राज जगताप आदी राष्ट्रवादी चे पदाधिकारी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे