आपल खान्देश

भुसावळमधील खंडाळ्यात विवाहितेची आत्महत्या

मृत अश्विनी यांचे पती यांचे यांचे शिक्षण एमबीए झाले असून फायनान्स बँकेत नोकरीस होते. मात्र कोरोनात त्यांची नोकरी गेल्याने ते घरीच होते.

जळगाव, 26 ऑगस्ट : भुसावळ तालुक्यातील खंडाळा येथे 28 वर्षीय विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना सकाळी उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली आहे. अश्विनी किशोर चौधरी असे मयत विवाहितेचे नाव आहे. आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही. दरम्यान, विवाहितेची मुले प्रणव (3 वर्षे) आणि श्रेयस (9 वर्षे) यांना उलट्यांचा त्रास होत असल्याने त्यांच्यावर डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यापैकी श्रेयसची प्रकृती गंभीर असल्याचे सूत्रांनी सांगितले.

अश्‍विनी चौधरी या विवाहितेने सकाळी 10.15 वाजेच्या सुमारास राहत्या बंगल्यात पंख्याला साडीने गळफास घेतला. मुलांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर ते रडतच बाहेर आल्यानंतर ही घटना समोर आली. तर विवाहितेची मुले प्रणव (3) व श्रेयस (9) हे घराबाहेर येताच उलट्या करीत असल्याने त्यांना गोदावरी रुग्णालयात उपचारार्थ हलवण्यात आले. या चिमुकल्यांना खाण्यातून विषबाधा झाली की त्यांना खाण्यातून काही विषारी द्रव पदार्थ देण्यात आला? या बाबीचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

पोलीस पाटील रतीलाल चौधरी यांनी विवाहितेच्या पतीसह तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी तेथे पडून असलेल्या काही औषधाच्या बाटल्याही पोलिसांनी ताब्यात घेतल्यात. मृत अश्विनीचा मृतदेह शववाहिनीद्वारे विच्छेदनासाठी जळगाव येथे हलवण्यात आला आहे.

ZOOM Advertising

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे