आपल खान्देश

जळगाव : कन्नड घाटात मुलाला मारहाण; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

जळगाव – सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला असून, त्यामध्ये तरुण-तरुणीला काहीजण मारहाण करीत असल्याचे दिसत आहे. पोलिसांनी मारहाण झालेल्या युवकाचा शोध घेऊन त्याच्या जबाब घेतला आहे. मारहाण करणाऱ्या तरुणांचा पोलीस शोध घेत आहेत. ही घटना चाळीसगाव तालुक्यातील कन्नड घाटात घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्‍ये तरुणांच्‍या टाेळक्‍याने एका तरुण-तरुणीला हटकले. तुम्ही दोघं सोबत का फिरतात? अशी विचारणा करून दाेघांना जबर मारहाण केल्याचा या व्हिडिओमध्ये दिसत आहे. तरुण- तरुणी सोबत फिरत असताना अचानक येऊन टाेळक्‍याने त्‍यांना जंगलात घेऊन जात लाकडी दांडक्याने मारहाण केली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे