आपल खान्देशब्रेकिंग

Pachora | भरपाऊसात मराठा जनआक्रोश मोर्चा, संतप्त नागरिकांनी काढली अंत्ययात्रा …

झूम मराठी ऑनलाईन न्यूज

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच चिघळला आहे. प्रमुख पक्षांचे नेते आंदोलनस्थळी भेट देत आहेत. त्याचवेळी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मराठा आंदोलकांवर केलेल्या लाठीचार्जबद्दल निषेध नोंदवण्यात येत आहे. जिल्हा बंदची हाक देत सरकारचा निषेध करण्यात येत असून पाचोरा तालुक्यात अंत्ययात्रा काढून सरकारचा निषेध नोंदवण्यात आला.

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून अमानुष लाठीचार्ज करण्यात आला होता. यामध्ये अनेक आंदोलक जखमी झाले आहे. मागील अनेक वर्षांपासून आरक्षणाची मागणी करण्यात येत आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावरील याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे आरक्षणाचा प्रश्न रेंगाळला आहे. दरम्यान पाचोरा येथे अंतरवाली सराटी येथील घटनेचा निषेध म्हणून मराठा समाज बांधवांनी तिरडीवर टरबूज ठेवून सरकारचा जाहीर निषेध करीत अंत्ययात्रा काढण्यात आली. अंत्ययात्रा वाजतगाजत काढण्यात आली. यावेळी पोलिस देखील घटनास्थळी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे