आपल खान्देश
पाचोरा शहरातील विविध नगरविकास कामांसाठी ४९ कोटी मंजुर
पाचोरा शहरातील विविध नगरविकास कामांसाठी ४९ कोटी मंजुर मंजुर झाल्याची माहिती आमदार किशोर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली
झूम मराठी पाचोरा । २३ ऑगस्ट २०२१। पाचोरा शहरातील विविध नगरविकास कामांसाठी ४९ कोटी मंजुर झाल्याची माहिती आमदार किशोर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पाचोरा शहरातील अंडर ग्राउंड ड्रेनेज मुळे झालेली रस्त्याची दुरावस्था कामासाठी वैशिट्यपुर्ण योजनेअंतर्गत निधीची मागणी करुन नगरविकास मंत्री यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला, नगरविकास विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या वैशिष्ट्यपुर्ण योजनेअंतर्गत पाचोरा नगरपालिकेला तब्बल 49 कोटी रुपयांचा निधी मंजुर झाला आहे अशी माहिती आमदार किशोर आप्पा पाटील यांनी पत्रकार परीषधेत दिली. या निधीतून पाचोरा शहरातील अंडर ग्राउंड ड्रेनेज मुळे झालेली रस्त्याची दुरावस्था रस्ते दुरुस्ती, रहिवासी ओपन स्पेस सुशोभीकारण, सोलर लाईटच्या कामांचा यात समावेश आहे.



