आपल खान्देश

पाचोरा कॉंग्रेस चा  रक्षाबंधन निमित्त अभिनव उपक्रम, महीला पदाधिकारींच्या हस्ते रक्षाबंधन


महीला आघाडी च्या पदाधिकारींनी कॉंग्रेस च्या पदाधिकारींना राखी बांधून औक्षण केले. या अभिनव उपक्रमाचा आदर्श इतर राजकीय पक्षांनी घ्यावा असा हा आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला

पाचोरा (प्रतिनिधी) – पाचोरा कॉंग्रेस च्या पदाधिकारींना रक्षाबंधन निमित्ताने महीला पदाधिकारींनी राखी बांधून अनोखा उपक्रम राबविला आहे

पाचोरा काॅग्रेस कडुन रक्षाबंधन निमित्ताने अनोखा उपक्रम राबविण्यात आला आहे यात महीला आघाडी च्या पदाधिकारींनी कॉंग्रेस च्या पदाधिकारींना राखी बांधून औक्षण केले. या अभिनव उपक्रमाचा आदर्श इतर राजकीय पक्षांनी घ्यावा असा हा आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी महीला आघाडीच्या जिल्हाउपाध्यक्षा श्रीमती कुसुम पाटील, शहराध्यक्षा श्रीमती शिला सुर्यवंशी,कल्पना निंबाळकर, साक्षी सुर्यवंशी, रेखा पाटील, कमळाबाई पाटील, आदींच्या हातुन राखी बांधण्यात आली. यावेळी तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, माजी प. स. सभापती शेख इस्माईल शेख फकीरा, शहर अध्यक्ष अॅड अमजद पठाण, तालुका सरचिटणीस प्रताप पाटील, अॅड. वसीम बागवान, मुकेश पाटील, बबलु पाटील, संजय सोनार, पप्पू सोनार आदी पदाधिकारी उपस्थित होते. या अनोख्या कार्यक्रमाची चर्चा शहरात होती

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे