आपल खान्देशमहाराष्ट्र
भुंजारीया (धान्यसन) उत्सव रक्षाबंधनच्या दुसऱ्या दिवशी मोठ्या उत्साहात साजरा होईल
ललिता गढरी
कुसुंबा | रक्षाबंधनाच्या दुसऱ्या दिवशी साजरा होणारा भुंजेरिया (धान्यसन) उत्सव 23 ऑगस्ट 2021 सोमवारी मोठ्या उत्साहात करोनाचे नियम सर्व पाळून साजरा केला जाईल असे कुसुंब्यातील अध्यक्ष छबिलाल परदेशी यांनी सांगितले.
कुठे आणि कसा साजरी कारतात भुंजेरिया उत्सव
खान्देशात विशेषतः कुसुंबा धुळे, जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात आखतवाडे, मोहळाई, बदरखे येथे भुजारीया सनाला विशेष महत्त्व मानले जाते. यासाठी श्रावन मासात नागपंचमी च्या दिवशीं घरांमध्ये भुजरींची पेरणी केली जाते. नंतर रक्षाबंधनच्या दुसऱ्या दिवशी भुंजारीया बाहेर काढल्या जातात त्यांची पूजा केली जाते व वाजत गाजत नदीत किंवा विहिरीवर धुतल्या जातात आणि सर्वप्रथम ते गावातील देवाला अर्पण केले जातात. यानंतर, लोक एकमेकांपासून भुजरियाची देवाण घेवाण करून, आपण केलेल्या चुका विसरून मिठी मारतात.

भुजंरिया सन साजरी करण्यासाठी आणि नवीन मित्र बनवण्यासाठीही या सणाला विशेष महत्त्व आहे. संध्याकाळच्या वेळी लोक नवीन कपडे घालून या सणाचा आनंद घेताना दिसतात. कुस्त्यांचे आयोजन केले जाते , विविध प्रादेशिक पक्ष आणि पक्षांद्वारे विविध ठिकाणी भुजारिया मिलन सोहळे देखील आयोजित केले जातात. भुजारिया सणाच्या निमित्ताने महिलांची प्रचंड उत्साहात शहर-गावातील नद्या आणि तलावांमध्ये पोहोचतात. या उत्सवाचा उत्साह लहान मोठंया मध्ये दिसून येतो.




