आपल खान्देशआरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

पाचोरा येथील भूषण पाटील PSI पदी निवड झाल्याने आमदार किशोर पाटील व वैशालीताई सूर्यवंशी यांनी केला सत्कार..

पाचोरा शहरातील भूषण पाटील PSI पदी निवड झाल्याने तालुक्यातील त्यांचे मित्र परिवार आमदार किशोर पाटील व वैशालीताई सूर्यवंशी यांनी केला सत्कार.

पाचोरा येथील गाडगेबाबा नगर मधील रहिवासी असलेले वसंत पाटील यांचे पुतणे व युवराज पाटील यांचे चिरंजीव भूषण युवराज पाटील यांनी नुकतेच परीक्षा दिलेली असताना त्यात त्यांना यश मिळाले  भूषण यांचे वडील व काका यांनी अत्यंत गरीब परिस्थितीतून दिवस काढलेले असून त्यांची पाचोरा शहरात वीस वर्षांपूर्वी प्रसिद्ध असलेले जुन्या कोर्टा जवळील प्रतिभा प्रिंटिंग प्रेस तसेच कुलस्वामिनी बेकरी असा दोघे भाऊ मिळून व्यवसाय करीत होते तसेच त्यांनी आपला व्यवसाय सांभाळून मुलांचे शिक्षण केले वसंत भाऊ यांचा मुलगा एमबीए झाला असून युवराज भाऊ यांचा मुलगा पीएसआय परीक्षा पास होऊन त्यांची नियुक्ती लवकरच होणार असून त्यांच्या या निवडीच्या आनंदात शिवसेना आमदार किशोर आप्पा पाटील यांनी त्यांच्या निवासस्थानी त्यांचे अभिनंदन व सत्कार आपल्या कार्यकर्तेसह केले तसेच ठाकरे गटाच्या शिवसेना फायरब्रँड नेत्या वैशालीताई सूर्यवंशी यांनी त्यांच्या घरी जाऊन भूषण पाटील यांचा सहपरिवार सहकुटुंब यांचा सत्कार केला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे