आपल खान्देश
अमळनेरमध्ये रिमोट कंट्रोलने 105 फूट स्तंभाचे ध्वजारोहण
रिमोट कंट्रोलने 105 फूट स्तंभाचे ध्वजारोहण करण्यात आले. नगरपालिका क्षेत्रात अभिनव प्रयोगअमळनेर नगरपालिकेने राष्ट्रहिताचा उपक्रम राबविल्याने नागरिकांकडून त्याचे स्वागत करण्यात आले
अमळनेर : शहरात नगरपरिषदेतर्फे स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवानिमित तिरंगा चौकाचे उदघाटन लोकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांच्या हस्ते तर आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते रिमोट कंट्रोलने 105 फूट स्तंभाचे ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी माजी आमदार साहेबराव पाटील,माजी आमदार स्मिता वाघ,उपनगराध्यक्ष विनोद लंबोळे, विरोधी पक्ष गटनेते प्रवीण पाठक,मार्केट च्या मुख्य प्रशासक तिलोत्तमा पाटील,तहसीलदार मिलिंद वाघ,पोलीस निरीक्षक जयपाल हिरे ,मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड यांची प्रमुख अतिथी म्हणून हजर होते.
पन्नास किलो वजनाचा ध्वजरिमोट कंट्रोलच्या मदतीने स्तंभावर ३० बाय २० फूट आकाराचा ५० किलो वजनाचा ध्वज डौलाने आकाशात फडकवण्यात आला. यावेळी.अनेकांनी या राष्ट्रीय सोहळ्याचा आनंद घेतला. दिवसभर अबालवृद्धांची तिरंग्यासोबत सेल्फी घेण्यासाठी गर्दी झाली होती. शहराबाहेर तीन चार किमी अंतरावरून तिरंगा दिमाखात फडकतांना दिसून येतो. कोरोनामुळे मागील दीड वर्षांपासून हा बहुचर्चित उपक्रम रखडलेला होता.
नगरपालिका क्षेत्रात अभिनव प्रयोगअमळनेर नगरपालिकेने राष्ट्रहिताचा उपक्रम राबविल्याने नागरिकांकडून त्याचे स्वागत करण्यात आले आहे. नगर पालिकेच्या सत्ताधारी व विरोधी सदस्यांनी एकमताने या ठरावाला संमती दिल्यामुळेच हे शक्य झाले असल्याचे नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांनी सांगितले. १०५ फुटांच्यावर तिरंगा ध्वज उभारण्याचा बहुमान उत्तर महाराष्ट्रातील अमळनेर नगरपालिकेला प्राप्त झाला आहे.





