आपल खान्देश

राज्यातील कोळी समाजास अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळे पर्यंत कोळी बांधव शांत बसणार नाही.!


झूम मराठी ऑनलाईन न्यूज मीडिया

पाचोरा (झूम मराठी) आदिवासी कोळी समाज अन्नत्याग उपोषणाची आदिवासी कोळी समाज अन्नत्याग उपोषणाची पाचोरा, भडगाव, चाळीसगाव तालुका स्तरावर बैठकीत निश्चय करण्यात आला असून पुढील काही दिवसात महाराष्ट्रभर तीव्र उपोषण सुरवात होणार आहॆ असे पाचोऱ्यात कोळी समाज बांधवांनी केला निर्धार.

आज  पाचोरा स्वामी लाॅन्स पाचोरा येथे मा. प्रभाकर आप्पा सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली ,प्रल्हाद सोनवणे(जिल्हा अध्यक्ष) जितेंद्र सपकाळे, संभाजी शेवरे, संजय सोनवणे चाळीसगाव,दशरथ जाधव, राजेंद्र मोरे सर पाचोरा, मच्छिंद्र आबा चाळीसगाव, किरण कोळी, ॲड.शांतीलाल सैंदाणे,खेमचंद कोळी, नामदेव कोळी,अनिल सावळे (सामाजिक कार्यकर्ते) अशोक महाले, अशोक सपकाळे , रविन्द्र शेठ ननावरे, किशोर रायसाकडा, सचिन सोनवणे,दिपक शेवरे, अनिल मासरे, अनिकेत सुर्यवंशी, रविन्द्र सुर्यवंशी, प्रविण मोरे, पप्पू कोळी, ठाकरे सर,महारु कोळी, संजय कोळी,बि.टी.बाविस्कर, संजय मासरे, भिकन कोळी शेकडो समाज बांधव उपस्थित होते. यावेळी जळगाव येथे होऊ घातलेल्या अन्नत्याग उपोषणासाठी संपुर्ण पाचोरा, भडगाव, चाळीसगाव तालुक्यातील कोळी समाज मोठ्या संख्येने सहभाग घेणार असल्याचे घोषित करण्यात आले, तसेच या उपोषणासाठी पाचोरा तालुक्यातील महीला,तरुण, विवीध संस्था/संघटना पदाधिकारी, विदयार्थी, यांचा सहभागासाठी आवाहन करण्यात आले

  • सुलभरित्या सरसकट जात प्रमाणपत्र मिळावे
  • जळगाव येथे जात पडताळणी समिती कायमस्वरूपी जळगाव येथे यावी
  • इतर समाजाप्रमाणे आदिवासी कोळी समाज विकासासाठी महर्षि वाल्मीकी ऋषी यांच्या नावाने महामंडळ स्थापन करण्यात यावे

या प्रमुख मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषण चालूच राहिल असे प्रभाकर आप्पा यांनी सांगितले सूत्रसंचालन सुभाष सपकाळे यांनी तर आभार प्रदर्शन संभाजी शेवरे यांनी मानले.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे