ब्रेकिंग

राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ संलग्न प्रोटान संघटनेची पाचोरा तालुका कार्यकारिणी जाहीर

निलेश पाटील, कार्यकारी संपादक 

पाचोरा (प्रतिनिधी) राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ संलग्न प्रोटान या संघटनेची पाचोरा तालुका कार्यकारिणी गठित करण्यात आली

याप्रसंगी प्रोटान संघटनेचे राज्य उपाध्यक्ष मा. गणेश काकडे जिल्हाध्यक्ष मा. मिलिंद भालेराव, जिल्हा कार्याध्यक्ष मा. मुबारक शाह सर, नाशिक विभागीय उपाध्यक्ष बी डी सुरवाडे, नाशिक विभागीय कार्याध्यक्ष मा महेंद्र तायडे, जिल्हा प्रभारी मा आनंद जाधव सर, राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष विलास पाटील व इतर पदाधिकारी उपस्थित होते याप्रसंगी तालुका कार्यकारिणी गठित करण्यात आली. मा ज्ञानेश्वर पाटील यांची तालुका अध्यक्षपदी, मा. राजेंद्र राठोड यांची तालुका सरचिटणीस पदी , मा. महेश घारगीळ यांची तालुका उपाध्यक्ष पदी, मा. सचिन पाटील यांची तालुका कोषाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. तसेच मा वासुदेव चव्हाण (सचिव), मा साहेबराव सुरवाडे (उपाध्यक्ष), मा रहीम बागवान (उर्दू प्रतिनिधी), मा प्रा. बी जे बोरसे पाटील (जेष्ठ सल्लागार), मा. विश्वनाथ भिवसने (कार्याध्यक्ष), मा. अल्ताफ कुरेशी (उर्दू प्रतिनिधी), मा डी एस सावळे (पदवीधर शिक्षक प्रतिनिधी), मा. शांताराम कुंभार (ग्रेडेड मुख्याध्यापक प्रतिनिधी), मा संदीप उद।वंत (सदस्य) ह्या पदावर निवड करण्यात आली. ह्याप्रसंगी मार्गदर्शन करताना मा गणेश काकडे यांनी संघटनेची ध्येय धोरणे, आगामी वाढ व विस्ताराबाबत सखोल मार्गदर्शन केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा मुबारक शाह यांनी, प्रास्ताविक मा विलास पाटील यांनी तर आभार मा रत्नाकर सोनवणे यांनी व्यक्त केले. मा सुनील दादा शिंदे यांनी नवीन कार्यकरिणीस शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे