आपल खान्देश
भडगाव – स्वर्गीय साधनाताई पाटील जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना अनेक विषयावर चर्चा सत्र
भडगाव – स्वर्गीय साधनाताई पाटील जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना अनेक विषयावर चर्चा सत्र
पाचोरा भडगांव – कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्थेचे टी.आर.पाटील विद्यालय, इंग्लिश मेडिअम स्कूल व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय वडजी येथे संस्थेच्या संचालिका तथा जळगांव जि.प.सदस्या स्वर्गीय साधनाताई प्रतापराव पाटील जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन विशाखा समिती अध्यक्षा वैशाली बिरहाडे व समिती सचिव पूनम पाटील यांचे हस्ते संपन्न झाले. मुख्याध्यापक डी.डी.पाटील, मा.प्र.मुख्याध्यापक बी.वाय.पाटील, जेष्ठ शिक्षक ई.एम.पाटील, आरोग्य समिती प्रमुख एस.जे.पाटील, प्राचार्य के.ए.मोरे, यांनी स्वर्गीय साधनाताई पाटील यांचे मौलिक योगदाना बाबत माहिती दिली. तसेच नियोजन समिती अध्यक्ष जे.एच.पवार यांनी संस्कार वर्गाचे आयोजन करून श्यामची आई पुस्तकातील नितिमूल्य संस्कार अनुभव कथन केले. विशाखा समितीने मासिक पाळी व्यवस्थापन चर्चा सत्राचे आयोजन करून विद्यार्थीनीना आरोग्य विषयक समस्या व उपाय यावर मार्गदर्शन केले.

प्रास्ताविक व सूत्रसंचालन वाय.ए.पाटील यांनी केले. सदर प्रसंगी सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी वृंद, विद्यार्थी, विद्यार्थीनी वर्ग उपस्थित होते. संस्थचे चेअरमन नानासाहेब प्रतापराव हरी पाटील, सचिव जिल्हा दूध संघाच्या संचालिका डॉ.पूनमताई पाटील, संचालक मंत्रालय सचिव प्रशांतराव पाटील, संचालक मा.नगराध्यक्ष श्यामकांत भोसले, संचालक इंजि.राहुल पाटील, नगरसेविका योजनाताई पाटील, मा.सभापती मनीषाताई पाटील, गटशिक्षणाधिकारी सचिन परदेशी, विस्ताराधिकारी गणेश पाटील, केंद्रप्रमुख संजय न्याहिदे, रविंद्र सोनवणे, संस्थेचे मुख्याध्यापक समन्वयक कमलेश शिंदे यांनी मार्गदर्शनपर शुभेच्छया दिल्या.




