महाराष्ट्र

“मुख्यमंत्री कुठेच दिसत नाहीत, मला तर अजित पवारच मुख्यमंत्री वाटतात; जे काही…”

वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. सध्या करोना कालावधीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री कुठेच आणि कोणाशीही चर्चा करताना दिसत नाही. मला तर अजित पवारच मुख्यमंत्री वाटतात. जे काही जाहीर करायचं असतं, ते अजित पवारच जाहीर करतात. अजित पवार मला डी फॅक्टो मंत्री वाटतात असंही आंबेडकर यांनी म्हटलं आहेत.

राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा आहे. त्यावर “अजित पवार म्हणतात की, रेमडेसिविर राज्य शासन इम्पोर्ट करणार आहे. पण शासनाला तसे अधिकार नाही. त्यामुळे अजित पवार कोणत्या अधिकाराने बोलत आहेत?,” असा सवाल देखील अंबेडकर यांनी उपस्थित केला.

राज्यात करोनाबाधित रुग्ण वाढत आहे. लॉक डाउनमधून ही चेन मोडणार नाही. त्याऐवजी जो पहिला रुग्ण आढळतो. तो किती जणांना भेटला आणि ती व्यक्ती पुढे किती लोकांना भेटली. यांच्यावर कामावर करणारी यंत्रणा निर्माण केली पाहिजे. जर तसे केल्यास चेन तोडणे शक्य होईल, अशी भूमिका अंबेडकरांनी मांडली 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे