आपल खान्देश
कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या जयंती निमित्त निसर्गमित्र जळगाव तर्फे ऑनलाईन सुगरण पक्षी प्रश्नमंजुषा’
जळगांव जिल्हा : (प्रतिनिधी) कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या जयंती निमित्त निसर्गमित्र जळगाव तर्फे ऑनलाईन सुगरण पक्षी प्रश्नमंजुषा’
११ ऑगस्ट कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या जयंती निमित्त निसर्गमित्र जळगाव तर्फे महाराष्ट्रव्यापी ऑनलाईन सुगरण पक्षी प्रश्नमंजुषा’घेण्यात येणार आहे, अशी माहिती पक्षीमित्र राजेंद्र व शिल्पा गाडगीळ यांनी दिली. प्रश्नमंजुषा ११ ते १५ ऑगस्ट या काळात सोडवायची आहे.
कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या जयंती निमित्त निसर्गमित्र जळगाव तर्फे महाराष्ट्रव्यापी ऑनलाईन सुगरण पक्षी प्रश्नमंजुषा’घेण्यामागील कारण स्पष्ट करतांना गाडगीळ म्हणाले की, साध्या आणि सरळ खानदेशी लेवा गणबोली मधून त्यांनी निसर्ग, पशू, पक्षी यांचे वर्तन व भावभावना प्रकट केल्या आहेत.
“अरे खोप्यामधी खोपा, सुगरणीचा चांगला,देखा पिलासाठी तिने झोका झाडाले टांगला !’
या ओळी मधून सुगरण पक्ष्याचे वर्णन केले आहे.या सुगरणपक्ष्याच्या विणीचा हंगाम आता सर्वत्र बहरला आहे.
हे औचित्य साधून आम्ही निसर्गमित्र जळगाव तर्फे बुधवार दि. ११ ऑगस्ट ते रविवार दि. १५ ऑगस्ट या कालावधीत ही प्रश्नमंजुषा घेतली आहे. आमच्या प्रतींनिधीशी बोलतांना म्हणाले की आम्ही कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेऊन ‘महाराष्ट्रव्यापी ऑनलाईन सुगरण पक्षी प्रश्नमंजुषा’ आयोजित केली आहे.
सर्व उत्तरे बरोबर असणार्यांनाच विशेष प्रमाणपत्र देण्यात येईल व बाकी सर्वांना सहभागाचे प्रमाणपत्र दिले जाईल. मात्र प्रश्नमंजुषा ११ते १५ ऑगस्ट या कालावधीत सोडवणार्यांनाच
प्रमाणपत्र मिळेल. स्पर्धकाने नोंदवलेल्या व्हाट्सएप क्रमांकावर त्याचे प्रमाणपत्र पाठवण्यात येईल. या प्रश्नमंजुषेमध्ये महाराष्ट्रातील व महाराष्ट्राबाहेरील सर्व लहानथोर नागरिक बंधु आणि भगिनींनी सहभाग घ्यावा व प्रश्नमंजुषेची लिंक सर्वत्र पाठवावी असे जाहीर आवाहन पक्षीमित्र शिल्पा व राजेंद्र गाडगीळ निसर्गमित्र,जळगाव तर्फे केले आहे.अधिक महितीसाठी व नियम व अटींसाठी व्हाट्सएप क्रमांक – ८९९९८०९४१६ वर संपर्क करावा असे ते म्हणाले.
‘महाराष्ट्रव्यापी ऑनलाईन सुगरण पक्षी प्रश्नमंजुषेची लिंक :-
https://forms.gle/H2fg1weTABZ6itdH6



