आपल खान्देशब्रेकिंग

पाचोऱ्यातून किशोरआप्पा पाटील यांची हॅट्रिक; आपल्या बहिणीचा केला पराभव..


पाचोरा विधानसभा मतदारसंघामधून आमदार किशोरआप्पा पाटील यांनी हॅट्रिक केली आहे. आमदार किशोरआप्पा पाटील यांनी सलग तिसऱ्यांदा आमदार होण्याचा बहुमान मिळवला आहे. किशोरआप्पा पाटील यांच्यासमोर आपलीच बहीण महाविकास आघाडीचे उमेदवार वैशाली सूर्यवंशी आणि अपक्ष उमेदवार अमोल शिंदे यांचे आव्हान होतं.

किशोरआप्पा पाटील यांचा विजय झाल्याने शिवसैनिकांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. पाचोरा विधानसभा मतदारसंघात किशोरआप्पा पाटील विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार  वैशाली सूर्यवंशी आणि अपक्ष उमेदवार अमोल शिंदे अशी तिरंगी लढत होती. पाचोरा विधानसभेच्या या आखाड्यात किशोरआप्पा पाटील यांनी आपली बहीण वैशाली सूर्यवंशी आणि अपक्ष उमेदवार अमोल शिंदे यांना चितपट केलं आहे.

एक महिना अगोदर अमोल शिंदे यांनी जोरदार प्रचार देखील सुरू केला होता. मात्र, त्यांचा आमदार किशोरआप्पा पाटील यांच्यासमोर निभाव लागला नाही.  वैशाली सूर्यवंशी आणि अमोल शिंदे व अपक्ष दिलीप वाघ यांनी वारंवार आरोप- प्रत्यारोप केले त्याचा फायदा त्यांना होऊ शकला नाही,

आमदार किशोरआप्पा पाटील यांच्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा झाली होती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी किशोरआप्पा पाटील हा माझा मानस पुत्र आहे, त्याला निवडून आणा मी किशोरआप्पा पाटील यांना मंत्री बनवेल अशी ग्वाही दिली होती..

  • किशोर पाटील- 97366, (महायुती)
  • वैशाली सूर्यवंशी – 58677 (मविआ)
  • अमोल शिंदे – 58171, (अपक्ष)
  • प्रताप हरी पाटील – 5688 (स्वराज्य)
  • माजी आमदार दिलीप वाघ – 5259, (अपक्ष)
  • नीलकंठ पाटील 1146, (अपक्ष)
  • वैशालीताई सूर्यवंशी -1005 (अपक्ष)
  • अमोलभाऊ शिंदे – 720
  • अमित तडवी 698
  • सतीश बिऱ्हाडे- 592 
  • मांगो पगारे – 475
  • मनोहर ससाणे 309
  • नोटा – 1911
  • वाया गेलेले मते -103
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे