आपल खान्देश
चोपड्याचे मा.तहसीलदार श्री.अनिल गावित साहेब यांनी गौऱ्यापाडा येथे भेट दिली
आज चोपड्याचे मा.तहसीलदार श्री.अनिल गावित साहेब यांनी गौऱ्यापाडा येथे भेट दिली
गौऱ्यापाडा चोपडा ता.|प्रतिनिधी- (मनोजसिंह गिरासे)आज गौऱ्यापाडा ग्रामस्वराज समिती मार्फत शाश्वत ग्रामविकासाच्या कामांच नियोजन व आढावा घेण्यासाठी आज चोपड्याचे मा.तहसीलदार श्री.अनिल गावित साहेब यांनी गौऱ्यापाडा येथे भेट दिली.

तेथे त्यांनी जलसंधारणाची येत्या महिन्यात सुरू होणारी काम व वनीकरणाच्या प्रस्तावांचा आढावा घेतला.यासंबंधी समितीच्या सदस्यांसोबत चर्चा देखील केली.यावेळी मंडळ अधिकारी पाटील जी , तलाठी श्री.तडवी YOG | चे उपाध्यक्ष श्री.दिव्यांक सावंत , गौऱ्यापाडा समितीचे विजुभाऊ , प्रकाश भाऊ , साईसिंग दादा , आपसिंग दादा , कांशीराम दादा तथा आदी ग्रामस्थ उपस्थित होते .



