एमपीएससी ची परिक्षा ४ सप्टेंबरला जाहीर झाली. या परिक्षेसाठी पोलीस उपनिरिक्षक पदाच्या 650 जागा घोषित केल्या आहेत. या साडेसहाशे जागांत NT क वर्गासाठी केवळ 2 जागा राखीव आहेत. नियमानुसार 3.5% म्हणजे किमान 23 जागा NT क वर्गासाठी आरक्षित असायला हव्या होत्या.
या अन्यायाबाबत NT क वर्गात येणा-या धनगर आणि इतर जमातीत रोष निर्माण झाला आहे. हा अन्याय दूर केला नाही तर धनगर समाज संघर्ष समिति (म.रा.) कडे राज्यव्यापी आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. सरकार दरबारी तात्काळ न्याय न मिळाल्यास पुढील आंदोलन, त्यामुळे कायदा व सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्यास सर्वस्वी सरकार व प्रशासन जबाबदार राहील.
खासदार पद्मश्री डॉ विकास महात्मे
संस्थापक अध्यक्ष धनगर समाज संघर्ष समिती (म.रा.)


बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा