आपल खान्देश

माझी वसुंधअभियाना अंतर्गत पाचोरा नगर नगरपरिषदेत, शपथ घेऊन (ई-शपथ) या उपक्रमाचा आरंभ

माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत पाचोरा नगर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, अधिकारी, व कर्मचारी यांनी हरित शपथ घेऊन #ePledge (ई-शपथ) या उपक्रमाचा आरंभ केला.

दिलीप परदेशी – मुख्य संपादक

“प्रत्येकाने पर्यावरणातील बदल लक्षात घेता आपली जीवनशैली पर्यावरण पूरक केली पाहिजे” असे आवाहन मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांनी केले. त्याबरोबरच विभागाच्या पोर्टल  https://majhivasundhara.in/mar/lets-pledge  वरती जाऊन ई-शपथ घेण्याचे आवाहन मुख्य अधिकारी यांनी सर्वांना केले.

काय आहे माझी वसुंधरा अभियान

महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने माझी वसुंधरा (माय अर्थ) हा पर्यावरण संवर्धन व संरक्षणाचा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमातून नागरिकांना वातावरणीय बदल आणि पर्यावरणाच्या समस्यांबद्दल जागरूक केले जाईल जेणेकरून त्यांना पर्यावरणाच्या सुधारणेप्रति जागरूकतेने प्रयत्न करता येतील.

या अभियानातून राज्याला वातावरणीय बदलाच्या समस्या सोडवण्यासाठी आणि विविध उपाययोजना हाती घेण्यातही मदत होईल.

हा विभागाकडून हाती घेतलेला भारतातील पहिला एकात्मिक उपक्रम आहे जो निसर्गाच्या “पंचमहाभूते” नावाच्या पाचही घटकांवर लक्ष केंद्रित करतो. त्यात भूमी (जमीन), जल (पाणी), वायू (हवा), अग्नी (ऊर्जा), आकाश (संवर्धन) यांचा समावेश असून त्यातून राज्याच्या शाश्वत विकासाप्रति प्रयत्न केले जातील.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे