आपल खान्देश

वेब मीडिया असोसिएशनची बोदवड तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्रात वेब पोर्टल पत्रकार संघटन'ला जोरदार प्रतिसाद मिळत असून प्रत्येक तालुक्यात वेब पोर्टल पत्रकार मोठ्या संख्येने या संघटनेत सामील होताना दिसून येत आहे.

जळगाव जिल्ह्यात वेब मीडिया असोसिएशनची बोदवड तालुका कार्यकारिणी जाहीर.संस्थापक अध्यक्ष अनिल महाजन यांच्या आदेशाने, विभागीय अध्यक्ष अजयकुमार जैस्वाल यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाध्यक्ष ईश्वर चोरडिया यांनी बोदवड तालुक्यातील वेब मीडिया असोसिएशन कार्यकारिणी केली जाहीर.

निलेश पाटील – कार्यकरी संपादक

बोदवड (प्रतिनिधी) जळगाव जिल्ह्यात वेब मीडिया असोसिएशनला व वेब पोर्टल पत्रकार संघटन’ला जोरदार प्रतिसाद मिळत असून प्रत्येक तालुक्यात वेब पोर्टल पत्रकार मोठ्या संख्येने या संघटनेत सामील होताना दिसून येत आहे.

आज बोदवड येथे वेब मीडिया असोसिएशन रजिस्ट्रेशन नं जी बी बी एस डी, मुंबई -284/2020 या संघटनेची प्रथम बैठक आयोजित करण्यात आली होती.पत्रकारांना न्याय मिळवून देण्यासाठी ही संघटना राज्यभर कार्यरत असून वेब मीडिया म्हणून एकमेव संघटना आहे. संगठनेचे अध्यक्ष अनिल भाऊ महाजन यांच्या आदेशाने, विभागीय अध्यक्ष अजयकुमार जैस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाध्यक्ष ईश्वर चोरडिया अध्यक्षतेखालील,जिल्हा सचिव दिनेश चौधरी, जिल्हा सरचिटणीस अमोल व्यवहारे, यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली.

बोदवड येथील तालुका पत्रकार व शहर पत्रकार यांच्या बैठकीत सर्वानुमते बोदवड तालुका कार्यकारिणी पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आली.

बोदवड तालुका अध्यक्ष जाफर मणियार , तालुका उपाध्यक्ष सुरेश कोळी व तालुका उपाध्यक्ष सचिन पाटील , तालुका सचिव रामेश्वर लोहार , तालुका सरचिटणीस विशाल तांगडे , तालुका समन्वयक गजानन बेलदार , तालुका खजिनदार अकरम शेख, तालुका सदस्य जितेंद्र गायकवाड, शाहरुख शेख यांची निवड करण्यात आली.

वेब मीडिया असोसिएशन बोदवड तालुका कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर सर्व नवनियुक्त पदाधिकारी व सदस्य यांचे नियुक्ती बद्दल सर्वत्र अभिनंदन व स्वागत होत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे