आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

राज्यातील खासगी ५६१ शैक्षणिक संस्थांच्या २ हजार ६२ जागांवरील शिक्षकांच्या भरतीची प्रक्रिया

पवित्र पोर्टलटच्या माध्यमातून राज्यातील विनाअनुदानित, प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांची भरती प्रक्रिया सुरू झाली असून पहिल्या टप्प्यात ५६१ शैक्षणिक संस्थांच्या २ हजार ६२ जागांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.

राज्यातील १२ हजार जागांपैकी ६ हजार जागांची भरती प्रक्रिया पूर्ण झाली आहे. उर्वरित ६ हजार जागांसाठी भरती प्रक्रिया शासनाने सुरू केली असून त्यातील पहिल्या टप्प्यात २ हजार ६१ जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये खासगी शाळांचा समावेश आहे.

अर्थात एका जागेसाठी दहा या प्रमाणात मुलाखतींचे नियोजन संस्थांच्या स्तरांवरून होणार आहे. पवित्र पोर्टलच्या माध्यमातून ही भरती प्रक्रिया होणार असल्याने ती प्रक्रिया पारदर्शी होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे