आपल खान्देशराजकीय
पाचोरा लाईव्ह – वेब मीडिया असोसिएशनच्या हजेरीत,अस्मिताताई पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव!
शिवसेना नेत्या अस्मिता पाटील त्यांच्या वाढदिवसानिमित्त, पाचोऱ्यात वेब मीडिया असोसिएशनच्या वतीने त्यांना आपुलकीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. करड्या शिस्तीच्या अस्मिताताई यांनी स्वतंत्रपणे वेळ देऊन शुभेच्छा स्वीकारल्या.

“शुभेच्छा आपुलकीच्या आपलेपणाच्या‘
आज अस्मिता पाटील त्यांच्या वाढदिवसानिमित्त, पाचोरातालुका व शहर वेब मीडिया असोसिएशन च्या पत्रकार बांधवानी त्यांना आपुलकीच्या शुभेच्छा दिल्या. करड्या शिस्तीच्या अस्मिताताई यांनी पाचोऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज व महानायक डाँ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला अभिवादन करून हुतात्मा स्मारकात पत्रकारांना स्वतंत्रपणे वेळ देऊन ताईनी शुभेच्छा स्वीकारल्या.

पाचोरा तालुक्यात अस्मिताताई पाटील नावंचे वलय सातत्याने दिसून येतो, अस्मिता फौंडेशन नावाने शैक्षणिक क्रांती केलीच आहे तालुक्यात त्यांच्या प्रत्येक कामाला तिथं प्रतिष्ठा आहे. ताई जिल्हापरीषद सांभाव्य उमेदवार म्हणून त्यांच्या कडे पहिले जाते, तालुक्यात त्याचं सामाजिक कामाची प्रचिती अस्मिताताईच्या वागणुकीतून सातत्यानं दिसून येत होती. अस्मिता ताईनी आपल्या सर्व पत्रकारांनां केलेल्या प्रेमाच्या संवादातून, वागणुकीतून त्याची अनुभूती पून्हा एकदा आली.

अस्मिताताईना शुभेच्छा देतांना श्री दिलीप जय परदेशी
अस्मिता ताईना शुभेच्छा देताना सचिन पाटील, राजेंद्र धनराळे, भुरे साहेब, जावेद शेख, निलेश पाटील भुवणेश दुसाने, दिलीप पाटील, संजय पाटील, बंडू सोनार व झूम मराठीचे संपादक दिलीप परदेशी हे उपस्थित होते

अस्मिताताईना शुभेच्छा देतांना निलेश पाटील
पाचोरा लाईव्ह – वेब मीडिया असोसिएशनच्या हजेरीत,अस्मिताताई पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव! https://t.co/q3WoRUaGT7
— ZOOM MARATHI (@DileepPardeshi) July 28, 2021




