आपल खान्देशब्रेकिंगमहाराष्ट्र
बाळाराम पाटील या शिक्षक आमदाराविरोधात खटला दाखल
पनवेल | बाळाराम पाटील या शिक्षक आमदाराविरोधात खटला दाखल करण्यात आला आहे, आ बाळाराम पाटलाच्या अत्याचाराविरोधात त्याच्याच संस्थेतील कर्मचारी उभे राहिले आहेत.
आमदारकी लढवताना शिक्षणक्षेत्रातील कर्मचाऱ्यांना न्याय देण्याच्या बाता मारून, बुडाखाली अंधार या न्यायाने स्वतःच्याच संस्थेतील कर्मचाऱ्यांना बिनपगारी ठेवून त्यांची उपासमार करणारा आणि वर शिक्षक आमदार म्हणून निर्लज्जपणे मिरवणारा, बुडालेल्या शेकापचा बाळाराम पाटील याला त्याच्याच संस्थेतील कर्मचाऱ्याने कोर्टात खेचले आहे.
नावडे तळोजे शिक्षण (?) संस्था या नावाखाली बाळाराम पाटलाने सार्वजनिक जागांवर अतिक्रमणे करून शाळा चालवल्या, कायम नोकरीच्या आमिषाने कर्मचारी भरले, त्यांना शेकापक्षाच्या कामासाठी जबरदस्तीने राबवले आणि जेव्हा स्वतःच्या कर्माने पक्ष बुडाला, तेव्हा याच कर्मचाऱ्यांवर अत्याचार सुरू केला. महिनोंमहिने पगार न देणे, बेकायदेशीर पद्धतीने कामापासून अडवणे, शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या आदेशांना फाट्यावर मारणे हे आणि असले उद्योग करून शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना छळणारा हा गावठी नेता (?) म्हणजे बेशरम राजकारण्याचे एक उदाहरण आहे.
कर्नाळा बँकेचा पाचशे कोटीचा घोटाळा करून स्थानिकांना चुना लावणाऱ्या शेकापच्या विवेक पाटलासोबत खरंतर आ बाळाराम पाटलाची सखोल चौकशी ईडीने केली पाहिजे. त्यातून आणखी महत्त्वाची माहिती बाहेर येईल. हे कधीतरी होणारच आहे.
मात्र हे होण्यापूर्वीच बाळाराम पाटलाच्या अत्याचाराविरोधात त्याच्याच संस्थेतील कर्मचारी उभे राहिले आहेत. पनवेलमधील नितळस हायस्कूल येथील श्री. नंदू भोपी (फोन 07021664649 ) या कर्मचाऱ्याने बाळाराम पाटलाच्या मनमानी व गुंडगिरीविरोधात फ्री प्रेस ऑनलाईन न्यूजच्या मदतीने सरळ कोर्टात खटला दाखल केला आहे. संपूर्ण कोकण मतदारसंघातील ज्या शिक्षकांनी या अत्याचारी माणसाला चाटूगिरी करून निवडून दिले, त्यांना तरी या प्रकाराची लाज वाटली पाहिजे आणि त्यासाठी त्यांच्याकडे स्वाभिमान आणि विवेकबुद्धी शिल्लक असली पाहिजे. याला मत देणारांकडे या गोष्टी नसल्यामुळेच हा माणूस शिक्षक कर्मचाऱ्यांवरील अन्याय अत्याचाराचा नंगानाच करीत आहे.
बाळाराम पाटील या शिक्षक आमदाराविरोधात खटला दाखल https://t.co/N7IAAeF3mz
— ZOOM MARATHI (@DileepPardeshi) July 27, 2021



