आपल खान्देशआरोग्य व शिक्षण
पाचोरा येथील विजयन निकमचे एल अँड टी कंपनीच्या स्पाँसरशिप परिक्षेत क्वालिफाय
पाचोरा शहर शिंपी समाज अध्यक्ष व उपविभागीय जलसंधारण अधिकारी श्री.सुर्यकांत देविदास निकम यांचे चिरंजीव विजयन यांचे आय.आय.टी.हैदराबाद येथे स्ट्रक्चरल इंजिनियरिंग मधील एम.टेक . साठी निवड झाली.चि.विजयन यास तिरूपती , मंडी , रोपर , पाटणा , जम्मू , जोधपुर , भुवनेश्वर , इंदोर तसेच एन.आय.टी.सुरथकल ( कर्नाटक ) येथिल सुध्दा ऑफर आल्या होत्या . एल अँड टी कंपनी तर्फे घेतलेल्या स्पाँसरशिप परिक्षेत ही यश मिळवुन क्वालिफाय झाला होता.विजयन यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे . विजयन याने पुणे येथील सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधुन सिव्हील इंजिनियरींग मध्ये विशेष प्राविण्यासह पदवी प्राप्त केली आहे.विजयनचे दि .१६ ऑगस्ट पासून नियमित कॉलेज सुरू होणार असून ते १० ऑगस्ट ला हैदराबादसाठी रवाना होणार आहेत




