आपल खान्देशगुन्हेगारी

धुळ्यात नशेच्या गोळ्या व गांजाची विक्री; दोघांना घेतले ताब्यात

धुळ्यात नशेच्या गोळ्या व गांजाची विक्री; दोघांना घेतले ताब्यात


धुळे : धुळे शहरात नशेच्या गोळ्या व गांजाची विक्री केली जात होती. याबाबत पोलिसांना मिळालेल्या महितीवरुन दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

शहरातील आझादनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असलेल्या चांद तारा चौकामध्ये अज्ञात इसम हा नशेच्या गोळ्या तसेच गांजा बाळगून त्यांची विक्री करत असल्याची गुप्त माहिती दारा मार्फत आझादनगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला असता या छाप्यात दरम्यान पोलिसांना 26 ग्रॅम गांजासह जवळपास 36 हजार 816 (कुत्ता गोळी) नशेच्या गोळ्या मिळाल्या आहेत. या सर्व मुद्दे मालाची जवळपास बाजारामध्ये 90 हजाराहून अधिकची किंमत मानली जात आहे. यासंदर्भात दोन आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.

पोलिसांचे आवाहन

अन्न व औषध विभागासह आझादनगर पोलिसांनी आरोपीच्या विरोधामध्ये विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून आझादनगर पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहून नशेच्या संदर्भात कुठल्याही प्रकारची माहिती मिळाल्यास पोलिसांना कळविण्याचे आवाहन देखील केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे