आर्यन खान ड्रग्ज प्रकरण समीर वानखेडे यांना तपासातून हटवले
5 नोव्हेंबर 2021 :– आर्यन खान ड्रग्ज प्रकरणानंतर अनेक घडामोडी महाराष्ट्राने पाहिल्या. आता या संदर्भात एक महत्वाची बातमी हाती आली आहे.
एनसीबीने आत सदर प्रकरणाच्या तपासाचे नेतृत्व करणारे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना तपासातून हटवले आहे. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलिस अधिकारी संजय सिंह यांच्या नेतृत्वाखाली एसआयटीकडे सोपवण्यात आला आहे.
क्रूझ ड्रग्ज प्रकरणानंतर समीर वानखेडेंवर सातत्याने आरोप होत होते. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी क्रुझवरील छापेमारी हा प्लान होता असा आरोप करण्यापासून ते वानखेडेंच्या राहणीमानापर्यंत विविध आरोप केले होते.
वानखेडेंच्या जातीच्या प्रमाणपत्रावरही त्यांनी संशय व्यक्त केला होता. त्यामुळे वानखेडे वादात सापडले होते.
त्यानंतर क्रुझ ड्रग्ज प्रकरणातील पंचानीही धक्कादायक कबुली दिली होती. तर काही पंचाना अटकही करण्यात आली होती.
त्यामुळे आता मिळालेल्या माहितीनुसार, समीर वानखेडे यांच्याकडून आर्यन खान प्रकरणाचा तपास काढून घेतला असला, तरीदेखील ते मुंबईचे झोनल डायरेक्टर म्हणून कायम राहणार आहेत. आता एनसीबीचे केंद्रीय पथक आर्यन खान आणि समीर खानच्या प्रकरणांची चौकशी करू शकते, असे बोलले जात आहे.
आता हे प्रकरण दुसऱ्या अधिकाऱ्याकडे वर्ग झाल्याने राजकीय वर्तुळातही प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. महाराष्ट्र सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी ही फक्त सुरुवात असल्याचे म्हटले आहे.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा