आपल खान्देश

धुळ्यात शिरपूर येथे बनावट मद्यसाठा कारवाई, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पाच अधिकारी आणि कर्मचारी निलंबित

 

शिरपूर येथील बनावट मद्य कारखाना उध्वस्त केल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई केली होती. या प्रकरणी आता धुळे येथील पाच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे

धुळे (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील शिरपूर येथे गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबई येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत कोट्यवधी रुपयांचा बनावट मद्यसाठा जप्त करण्यात आला होता. या कारवाईची गांभीर्याने दखल घेत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वरिष्ठांनी धुळे येथील राज्य उत्पादन शुल्क विभागातील पाच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निलंबित केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील अजंदे शिवारातील पद्मावती कापूस खरेदी विक्री केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिनिंगमध्ये सुरु असलेल्या बनावट मद्याच्या कारखान्यावर मुंबई येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने 9 जून रोजी धाड टाकली. या कारवाईत एक कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करीत हा कारखाना उध्वस्त करण्यात आला होता. मुंबई येथील पथकाने केलेल्या या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली होती.

धुळे जिल्ह्यात एवढा मोठा बनावट मद्याचा कारखाना सर्रासपणे सुरु असल्याची माहिती असून देखील स्थानिक अधिकारी काय करतात? असा प्रश्न उपस्थित झाला होता. या कारवाईची गांभीर्याने दखल घेत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वरिष्ठांनी धुळे येथील राज्य उत्पादन शुल्क निरिक्षक, दुय्यम निरीक्षक आणि जवान या पदावरील पाच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. तसेच या प्रकरणी जिल्हा अधीक्षकांची ही तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे