महाराष्ट्र
ठाकरे सरकारची मोठी घोषणा; सर्व नागरिकांना मोफत मिळणार लस.!
ठाकरे सरकारची मोठी घोषणा; सर्व नागरिकांना मोफत मिळणार लस.!
राज्यात कोरोनानं पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढताना दिसत आहे. अशातच लसीकरणसंदर्भात महाविकास आघाडी सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील १८ वर्षावरील सर्वांना मोफत लस देण्यात येणार आहे. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी यासंदर्भातली माहिती दिली आहे. त्यासाठी स्वस्त दरात आणि चांगली लस उपलब्ध व्हावी म्हणून जागतिक टेंडर काढण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यसरकारच्या तिजोरीतून कार्यक्रम हाती घेण्यात येणार असल्याचं नवाब मलिक यांनी सांगितलं.




