आपल खान्देशमहाराष्ट्रसखी

पाचोरा तालुक्यातील नांद्रा येथे महिला सक्षमीकरण मेळावा संपन्न

  • दिलीप जय परदेशी @ झूम मराठी न्यूज 

नांद्रा (ता. पाचोरा) येथील कल्याणदास आश्रम श्रीराम टेकडी येथे महिला सक्षमीकरण मेळावा नुकताच झाला, याप्रसंगी पाचोरा भडगावचे आमदार किशोर पाटील यांच्या अध्यक्षस्थानी नांद्रा बसस्थानकावर  लोकसेवा केंद्राचे लोकार्पण करण्यात आले.

याप्रसंगी आमदार किशोर पाटील म्हणाले की, राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवरायांना जसे संस्कार दिले, तसे संस्कार आजच्या युगात महिला भगिनींनी आपल्या पाल्यांना द्यावेत. महिला बचत गटांना भविष्यात अधिकाधिक चालना मिळेल. महिला या बँकिंग, आयटी तसेच इतर विविध क्षेत्रात आघाडीवर आहेत. घरातील मुलांसोबत मुलींनाही तुम्ही चांगले संस्कार द्या. पुरुषांनी महिलांच्या पाठीमागे उभे राहिले पाहिजे. महिलांनी शासनाच्या लेक लाडकी योजनेचा लाभ घ्यावा. लहान-मोठे उद्योग व्यवसाय करावे, असे आवाहन केले. प्रांताधिकारी भूषण अहिरे, जगदीश पाटील, रमेश जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक संदीप पाटील यांनी केले. सूत्रसंचालन अंजली चव्हाण यांनी केले.

अध्यक्षस्थानी आमदार किशोर पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रांताधिकारी भूषण अहिरे, तालुका कृषी अधिकारी रमेश जाधव, सहायक कामगार आयुक्त जगदीश पाटील, बाजार समितीचे सभापती गणेश पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, पद्मसिंग पाटील, सुनील पाटील, पंढरीनाथ पाटील, सीमा सूर्यवंशी, सुभाष तावडे, शिवाजी तावडे, किरण पाटील, राजेंद्र पाटील, अर्चना पाटील, साधना देशमुख आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदीप पाटील यांनी केले. सूत्रसंचालन अंजली चव्हाण यांनी केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे