आपल खान्देश
पाचोरा तालुका वेब मिडिया असोसिएशन घोषीत झाली आहे.
वेब मिडीया असोसिएशन मुंबई च्या – जळगाव जिल्हा वेब असोसिएशन व पाचोरा वेब मिडिया असोसिएशन च्या कार्यकारणी पदाधिकारी यांचे विविध स्तरातून शुभेच्छाचा वर्षाव होताना दिसत आहे
ZOOM MARATHI WEB NETWORK
पाचोरा | वेब मिडीया असोसिएशन मुंबई चे अध्यक्ष श्री.अनिलभाऊ महाजन यांच्या आदेशानुसार व मार्गदर्शनाखाली विभागीय अध्यक्ष अजयकुमार जैस्वाल जिल्हा अध्यक्ष ईश्वरभाऊ चोरडिया यांच्या नेतृत्वाखाली जळगाव जिल्हा व पाचोरा तालुका वेब मिडिया असोसिएशन घोषीत झाली आहे.

वेब मिडिया असोसिएशन चे वेब पोर्टल चे असलेले पाचोरा पदाधिकारी पत्रकार व संपादक हे दिवस-रात्र हे सर्वांना मोठे करण्यासाठी आपली सेवा देत असतात आणि ते सर्व मंडळीची वेब मिडीया जिल्हा व तालुका असोसिएशन पदी निवड झाली हि आम्हा सर्वांना अभिमानास्पद बाब आहे, असे म्हणत सिद्धिविनायक मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल चे संचालक डॉक्टर स्वप्नील प्रल्हाधराव पाटील व त्यांच्या सौ. डॉक्टर ग्रीष्मा स्वप्नील पाटील तसेच सिद्धिविनायक मेडिकल संचालक स्टाफ दीपक पाटील(आबा), गौरव चौधरी, शरद मराठे, डॉक्टर भरत पाटील, डॉक्टर भिकन कपाटे, सिद्धिविनायक पॅथॉलॉजि संचालक यशवंत मांडोळे(तारखेडेकर), यांच्यावतीने नूतन कार्यकारणीचा सत्कार सोहळा आज सर्वांच्या उपस्थितीत शाल, श्रीफळ, गिफ्ट, नास्ता, चहापान देऊन मोठ्या उत्साहात संपन्न झाला, यावेळी समस्त पदाधिकारी पत्रकार बांधवांतर्फे डॉक्टर स्वप्नील पाटील यांना डॉक्टर्स डे च्या शुभेच्छा देऊन त्यांचे आभार मानण्यात आले, डाॅ.स्वप्नीलदादा यांनी मोठ्या मनाने आज सर्व वेब मिडीया असोसिएशन चे पदाधिकारी यांचे स्वागत व सत्कार केले.

यावेळी वेब मिडीया असोसिएशन पदाधिकारी जिल्हा उपाध्यक्ष सचिनभाऊ पाटील व प्रदेश कार्यकारिणी सदस्य योगेशभाऊ पाटील जिल्हा सरचिटणीस गणेश शिंदे व जिल्हा सचिव नंदुभाऊ शेलकर व जिल्हा संघटक नरसिंह भुरे व जळगाव जिल्हा समन्वयक जावेद शेख जळगाव जिल्हा खजिनदार पदी -फोकस न्युज कार्यकारी संपादक भुवनेश दुसाने तालुका अध्यक्ष -एम एन न्युजचे निलेश पाटील उप तालुका अध्यक्ष -तालुका माझा संपादक बंडुभाऊ सोनार उप तालुका अध्यक्ष -सी एन आय महाराष्ट्र दिपक गढरी तालुका सचिव -झेप इंडियाचे संजय पाटील तालुका सरचिटणीस- झुम मराठी संपादक दिलीप परदेशी तालुका समन्वयक- जनलक्ष संपादक प्रमोद बारी जेष्ठ मार्गदर्शक ट्रेन लाइव्ह प्रवाशी संघटनेचे दिलीप पाटील या वेब असोसिएशन पदाधिकारी यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला.




