आपल खान्देशगुन्हेगारी

सापाला आपटून-आपटून केले ठार; व्हिडीओ व्‍हायरल

Dilip_pardeshi@Zoommarathinews.

जळगाव : पहुर (ता.जामनेर) येथे एकाने ‘धामण’ जातीच्या सर्पास जमिनीवर आपटून आपटून ठार मारल्याची घटना आज घडली. याबाबत वन्यजीव संरक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी या घटनेचा निषेध केला आहे.

एका शेतातून संशयित तरुण धामण सर्पांचा पाठलाग करत येतोय. मुख्य रस्त्यावरून एका दुचाकीवर चार तरुण जात असताना धामण सर्प त्यांच्या दुचाकी जवळ येतो आणि ते खाली पडतात. पाठोपाठ संशयित तरुण तो धामण साप पकडून त्याला तात्काळ आपटून ठार करतो. खुप मोठे काम केले या आविर्भावात वावरतो. माणुसकीच्या नात्याला काळिमा फासणारी ही कृती सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर समाजमन सुन्न झाले होते.

हा व्हिडीओ समोर येताच त्यातील दुचाकीवर दिसणाऱ्या (एमएच-१९ बीबी-१४९०) क्रमांकाला बघून वन्यजीव संरक्षण संस्थेच्या जिल्हातील कार्यकर्त्यांनी शोध घेण्यास सुरवात केली. मानद वन्यजीव रक्षक रवींद्र फालक, बाळकृष्ण देवरे यांनी जळगाव वनविभागाचे उपवन संरक्षक विवेक होशिंग यांना सदर व्हिडीओ, पाठवला आणि दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. घटनेचे गांभीर्य लक्षात येताच विवेक होशिंग साहेबानी संबंधित रेंज ऑफिसला तात्काळ त्या दुचाकींचा आणि धामण सापास मारणाऱ्या तरुणांचा शोध घेऊन दोषींवर कारवाईचे करण्याचे आदेश दिले.

कोणताही वन्यजीव हाताळणे, त्याचा पाठलाग करणे, जखमी करणे, ठार मारणे , वन्यजीवास त्रास होईल असे कुठलेही कृत्य वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ शिकार कलम अंतर्गत गुन्हा ठरते. त्यानुसार गुन्हेगारास जबर शिक्षा झाली पाहिजे. जेणेकरून भविष्यात अश्या घटना घडणार नाहीत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे