पाचोरा येथे राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य मा.रविंद्र नाना पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व माजी आमदार मा.दिलीप भाऊ वाघ यांच्या अध्यक्षतेखाली काल राष्ट्रवादी युवक काँग्रेस जळगावतर्फे आयोजित ‘युवक जोडो व संपर्क अभियानाची’ सुरुवात व आढावा नियोजन बैठकीद्वारे करण्यात आली.
यावेळी अध्यक्षीय भाषणात माजी आ.दिलीप वाघ यांनी राज्यात महाविकासआघाडी सरकारची सत्ता असल्याने मतदारसंघातील अधिकाधिक ग्रामपंचायतींनी आपापल्या क्षेत्रातील विकासकामांसाठीचे प्रस्ताव तयार करून माझ्यापर्यंत आणावेत, ही कामं करणं माझी जबाबदारी असल्याचा शब्द देत आपली भूमिका स्पष्ट केली. शिवाय येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीची तयारीही आतापासूनच सुरू करत कामाला लागण्याचा सल्लाही उपस्थित कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना दिला. यात जर पक्षाने आघाडी करून लढण्याचा आदेश दिला तर राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी करूनही निवडणूकीत उतरेल असं यावेळी ते म्हणालेत. यानंतर युवक जिल्हाध्यक्ष मा.रवींद्र नाना पाटील यांनी पक्षस्थापनेपासून तब्बल १५ वर्षे सत्तेत असतांना राष्ट्रवादी काँग्रेसने घेतलेले लोकहिताचे निर्णय, यात आदरणीय पवारसाहेबांनी केंद्रीय कृषिमंत्री असतांना कृषी, कला, क्रीडा,महिला सबलीकरण, सामाजिक तसेच इतर क्षेत्रात दिलेलं अमूल्य योगदानाविषयीही माहिती देत पक्षाने केलेली कामे जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोहचवावी म्हणत यासाठी युवकांचा पक्षात मोठ्या संख्येने भरणा करण्याची गरज असल्याचं म्हटलं. म्हणून प्रदेशाध्यक्ष मा.जयंत पाटीलसाहेबांनी मांडलेली ‘वन बूथ, टेन युथ’ ही संकल्पना प्रभावीपणे राबवण्यासाठी तालुका तसेच शहरस्तरावर बूथ कमिट्याची रचना मजबूत करावी असं मत व्यक्त केलं.

यावेळी या आढावा व नियोजन बैठकीला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष मा.दीपक पाटील, पाचोरा न.पा.चे गटनेते मा.संजयनाना वाघ, तालुकाध्यक्ष मा.विकास पाटील सर, शहर अध्यक्ष मा.अझर खान, विधानसभा क्षेत्र प्रमुख मा.नितीन तावडे, जिल्हाउपाध्यक्ष मा.विजू आप्पा, युवक जिल्हा कार्याध्यक्ष मा.दिपक पाटील, भडगाव तालुकाध्यक्ष मा.संतोष भाऊ, भडगाव कार्याध्यक्ष मा.हर्षल पाटील, पाचोरा तालुका राष्ट्रवादी युवक निरीक्षक तथा जिल्हाउपाध्यक्ष मा.अंकुश भागवत, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मा.पंकज गढरी, राष्ट्रवादी युवक भडगाव तालुकाध्यक्ष मा.स्वप्नील पाटील, राष्ट्रवादी युवक पाचोरा तालुकाध्यक्ष मा.अभिजित पवार, शहराध्यक्ष मा.सुदर्शन सोनवणे, जिल्हा सरचिटणीस मा.गौरव पाटील, जिल्हा संघटक मा.उमेश एरंडे, मा.लोकेश पाटील, जिल्हा सचिव मा.सचिन शिंदे, जिल्हा युवक प्रवक्ते मा.भूषण पाटील तसेच अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते बांधव उपस्थित होते.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा