आपल खान्देश

बदलापूरात चोपडा ते बदलापूर बसचे जल्लोषात स्वागत!!

दिलीप परदेशी,

बदलापूर (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य वाहतूक मंडळ चोपडा आगारातून खान्देशातील प्रवाशी साठी चोपडा ते बदलापूर ही बस सुरू करण्यात आली आहे तिचे बदलापूरात जल्लोषात स्वागत करण्यात आले.

मुंबईत व उपनगरात आपला खान्देशी बांधव तिकडे नोकरी व व्यवासायात चांगलाच स्थिरावलाय खास त्यांच्या येण्या जाण्याच्या सोई साठी चोपडा आगारातून चोपडा ते बदलापूर ही बस सुरू करण्यात आली आहे तिचे बदलापूरातील अहिराणी-खान्देशी बांधवाच्या संघटनानी खान्देशातून येणाऱ्या बसचे जल्लोषात स्वागत कारण्यात आले. त्यात खान्देश मराठा मंडळ बदलापूर, उत्तर महाराष्ट्र धनगर महासंघ, खान्देश विश्व परिषद बदलापूर व संत सेना महाराज मंडळ बदलापूर याच्या वतीने चालक व वाहकांचा सत्कार करण्यात आला तसेंच चोपडा आगार व्यवस्थापक महाजन साहेबांचे मन पूर्वक आभार व्यक्त करण्यात आले

चोपडा स्थानकातून सकाळी 8.30 ला सुटेल अमळनेर/ धुळे/मालेगाव/चांदवड/पिंपळगाव/नाशिक/इगतपुरी/शहापूर/कल्याण/उल्हासनगर /अंबरनाथ/बदलापूर अशी असेल तसेच परतीला बदलापूर हुन सकाळी=6 वाजता निघेल. जाताना पण वरील प्रमाणे मार्ग असेल.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे