आपल खान्देशगुन्हेगारी
चाळीसगावात SBI चे ATM मशीनच चोरून नेले
एटीएममध्ये १७ लाखांची कॅश, घटनास्थळी पोलिसांचे पथक दाखल
चाळीसगाव (प्रतिनिधी) शहरातील खरजई नाक्या जवळील स्टेट बॅक ऑफ इंडियाचे १७ लाख रुपये असलेले एटीएम मशीन रात्री १.३० वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेले आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडली आहे.
घटनास्थळी पोलिसांचे पथक दाखल झाले असून ते पंचनमा करीत आहे. दरम्यान चोरट्यांनी चारचाकी वाहनातून एटीएम मशीन चोरुन नेल्याने पोलीस चारचाकी वाहनाबाबत काही सुगावा लागतो यादृष्टीने तपास करीत आहेत. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी उपविभागीय आधिकारी कैलास गंवाडे, पो.नि.विजयकुमार ठाकुरवाड, एपीआ विशाल टंकले यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित आहेत.





