ब्रेकिंग

कल्पना परदेशी यांची ‘उत्तर महाराष्ट्र धनगर महासंघाच्या’ मुंबई महिला अध्यक्ष पदी नियुक्ती!

बदलापूर (प्रतिनिधी )उत्तर महाराष्ट्र धनगर महासंघ या संघटनेची मुंबई महिला कार्यकारिणी गठीत करण्यात आली असून त्यात कल्पना परदेशी यांची  मुंबई महिला आघाडी अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्र धनगर महासंघाचे (रजि.) संस्थापक सल्लागार जेष्ठ समाज सेवक मा.बापुसाहेब हटकर यांच्या शुभ हस्ते कल्पनाताई परदेशी यांची मुंबई महिला आघाडी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. यावेळी उमधम चे अध्यक्ष मा.ज्ञानेश्वर परदेशी, नवीमुंबई जिल्हा अध्यक्ष मा. संदिप पांढरे , कल्याण अध्यक्ष मा.महेंन्द्र परदेशी, अम्बरनाथ अध्यक्ष मा.गणेश गढरी , बदलापुर अध्यक्ष मा. राजेंन्द्र गढरी इ.उपस्थित होते, मा.बापुसाहेब हटकर यांनी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे नवीन चित्र भेट देऊन अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या. श्री.महेन्द्र परदेशी यांनी मनोगत व्यक्त करुन ताईसाहेबाना शुभेच्छा दिल्या. कल्पना ताईची नियुक्ती झाल्या बददल समाज बांधवांकडून आनंद व्यक्त होत आहे.श्री.संदेश परदेशी राज्य प्रसिद्धी प्रमुख यांनी मत व्यक्त केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे