आरोग्य व शिक्षणब्रेकिंग

Coronavirus – राज्यात दिवसभरात २४ हजार ६४५ करोनाबाधित वाढले, ५८ रूग्णांचा मृत्यू

राज्यात आज रोजी एकूण २,१५,२४१  ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

राज्यात करोनाचा संसर्ग दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. दररोज आढळणाऱ्या नवीन करोनाबाधितांबरोबरच मृत्यूंच्या संख्येतही वाढ सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर आज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारपरिषद घेऊन, रूग्ण संख्या अशीच वाढत राहिली तर, काही शहरांमध्ये लॉकडाउन सुरू करावं लागेल, असा सूचक इशारा देखील दिला आहे. दरम्यान, आज दिवसभरात राज्यात २४ हजार ६४५ नवीन करोनाबाधित आढळले असून, ५८ रूग्णांच्या मृत्यूंची नोंद झालेली आहे.  सध्या राज्यातील मृत्यू दर २.१३ टक्के एवढा आहे.

राज्यात आज रोजी एकूण २,१५,२४१  ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.याशिवाय आज १९  हजार ४६३ रुग्ण करोनातून बरे देखील झाले आहेत.  राज्यात आजपर्यंत एकूण २२,३४,३३०  करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ८९.२२  टक्के एवढे झाले आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,८४,६२,०३० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २५,०४,३२७ (१३.५६ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १०,६३,०७७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ११,०९२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे