आपल खान्देशमहाराष्ट्र

२५ हजाराचा लाच..तलाठीसह पंटर जाळ्यात

धुळे (अमळथे ता. शिंदखेडा) येथील प्रभारी तलाठी व खासगी पंटर यांनी वाटणी प्रकरण तयार करून ते तहसीलदारकडे पाठविण्यासाठी ४० हजार रूपयांच्‍या लाचेची मागणी केली होती. शिंदखेडा येथे २५ हजाराची लाच स्विकारतांना धुळे लाचलुचपत विभागाने तलाठी व पंटरला रंगेहात पकडले.

आच्छी येथील पुरूष तक्रारदार (वय ४४) यांची आच्छी गावशिवरात आई– वडीलांचे नावे असलेली शेत जमिनी आहे. सदर जमिनीचे तक्रारदार यांचे भावंडांमध्ये वाटणी प्रकरण तयार करून ते शिंदखेडा तहसीलदार यांच्याकडे पाठवण्यासाठी अमळथे सजाचे प्रभारी तलाठी नवनीत खंडेराव पाटील (वय ३२, रा शिरपूर) यांनी ४० हजार रुपये लाचेची मागणी केली होती.

तक्रारदाराने धुळे येथील लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली होती. त्‍यानुसार लाचलुचपत विभागाने सापळा रचला होता. या कारवाई दरम्यान २५ हजार रुपयांचा (पहिला हप्ता) स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी खाजगी पंटर संतोष रमेश भदाणे (वय ३६, रा.आमळथे) यांच्या हस्ते स्‍वीकारली. यावेळी लाचलुचपत पथकाने पंच व साक्षीदार समक्ष सापळा कार्यवाही दरम्यान आरोपी यांना ताब्यात घेतल्यानंतर आज धुळे जिल्हा न्यायालयात हजर केले आसता उद्यापर्यंत (ता.१७) पोलिस कोठडी देण्यात आली आहे. सापळा पथकातील कृष्णकांत वाडीले, राजन कदम, प्रशांत चौधरी, भुषण खलाणेकर, भूषण शेटे, गायत्री पाटील, चालक सुधीर मोरे आदींनी कारवाई केली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे