आपल खान्देश

पाचोरा शहरातील तलाठी कॉलनीतील श्रीस्वामी समर्थ महिला मंडळ ग्रुप तर्फे नवरात्रीनिमित्त कैला देवी मंदिर येथे भेट..


झूम मराठी | डिजिटल आवृत्ती 

पाचोरा (प्रतिनिधी अनिल आबा येवले) पाचोरा येथील तलाठी कॉलनीतील श्री स्वामी समर्थ महिला ग्रुप तर्फे अनेक विविध कार्यक्रम घेतले जातात त्यामध्ये महिलांकरता सामाजिक उपक्रम महिलांसाठी मार्गदर्शन महिलांनी जास्त जास्त शिक्षणात भाग घेऊन उच्च पदावर जावे तसेच राजकारणातही भाग घेऊन समाज जागृती निर्माण करणे महिलांवरील होणाऱ्या अन्यायासाठी लढा देणे महिलांनी कुठल्या क्षेत्रात मागे राहू नये यासाठी कार्य करत राहणे तसेच या ग्रुप तर्फे नवरात्र निमित्त महिलांकरता गरबा नृत्य दांडिया रास असे विविध कार्यक्रम घेतले जातात यावर्षी त्यांनी कार्यक्रम वेगळा कार्यक्रम घेऊन महिलांचे उत्साह वाढविले.

भडगाव रोडवरील कैला देवी मंदिर येथे या ग्रुप तर्फे सर्व महिला एकत्र जमून देवीचे पाठ व आरती करून देवीला साकडे घातले यामध्ये श्री स्वामी समर्थ महिला मंडळ अध्यक्ष सरला पाटील ललिता पाटील गौरी पाटील सरला परदेशी सुरेखा पाटील, सुवर्णा शिंदे साक्षी पाटील, संध्या पवार या असे अनेक महिलांनी भाग घेऊन जनजागृती निर्माण केली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे