आपल खान्देश

जळगाव – कंटेनरने दुचाकीला उडविले; बाप-लेक ठार !

जळगाव : प्रतिनिधी । भरधाव वेगाने धावणार्‍या कंटेनरने दुचाकीला दिलेल्या धडकेत बाप-लेक ठार झाल्याची दुर्घटना गुजरात पेट्रोल पंपाजवळ घडली असून कंटेनरच्या चालकाला आज अटक करण्यात आली आहे.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, पिंप्राळ्यातील रहिवासी नागेश्‍वर पवार (वय ३५) हे आपल्या पाच वर्षाच्या कार्तीक या मुलासह रात्री नऊच्या सुमारास घरी येत होते. यावेळी भरधाव वेगाने धावणार्‍या कंटेनरने त्यांच्या दुचाकीला उडविले. यात या दोन्ही बाप-लेकाचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, कंटेनर चालकाने अपघात झाल्यानंतर घटनास्थळावरून पलायन केले होते. या अर्जुन कुमार सिंग नावाच्या चालकाला आज अटक करण्यात आली आहे. बाप-लेकाच्या अपघाती मृत्यूमुळे पिंप्राळा परिसरावर शोककळा पसरली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे