पाचोरा शहरांत अनधिकृत बॅनर होर्डिंग लावणाऱ्यांवर होणार कारवाई..!
दिलीप परदेशी
झूम मराठी न्यूज टीम – पाचोरा शहरातील अनधिकृत बॅनर व होर्डिंग अंमलबजावणी करण्याचे आदेश पाचोरा पोलीस स्टेशनला, पाचोरा नगरपालिकेकडून परवानगी पत्र कार्यालयात आल्यानंतर त्यावर प्रसिद्ध होणारा मजकूर तपासूनच परवानगी दिली जाणार आहे. विनापरवानगी होर्डिंग लावणाऱ्यांवर सशुल्क दंडाची करावाई करण्यात येणार असल्याचे पाचोरा पोलीस स्टेशन द्वारे आदेश काढले आहे.
आगामी नवरात्र उत्सव, दसरा, दिवाळी,नवीन वर्ष, नगरपालिक पालिका निवडणूक आदी सर्व कार्यक्रम लक्षात घेऊन राजकीय, सामाजिक, तसेच विविध कंपन्यांकडून नागरिकांना, मतदारांना अनेक प्रलोभने दाखवली जातात, त्याला बळी पडून अनेकांचे नुकसान होत असते.
टोकन नंबर व जागा निश्चित नगरपालिकेने ठरवून दिलेल्या अधिकृत जागांवरच होर्डिंग लावण्यापूर्वी पाचोरा पोलिसांची परवानगी आवश्यक असणार आहे. शहराला शिस्तबद्ध पद्धतीने होर्डिंगमुक्त करणे, हा उद्देश पोलिस प्रशासांनाचा आहे.
राजकीय, सामाजिक, जाहिरात स्वरूपात असले तरी संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे.अनधिकृत ठिकाणी श्रद्धांजली, धार्मिक, तसेच जातीय तेढ निर्माण करणारे होर्डिंग थेट जप्त करून त्याची विल्हेवाट लावण्यात येणार आहे, शिवाय त्यांना पोलिस कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांच्यासोबत या होर्डिंग परवानगी संदर्भात चर्चा झाली असून पाचोरा नगरपालिका प्रशासन देखील सहकार्य करणार आहे.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा