आपल खान्देशमहाराष्ट्र

आषाढी वारीसाठी वारकऱ्यांकडून बायो बबलचा प्रस्ताव, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार

पंढरीच्या आषाढी पायवारीसाठी ‘बायो-बबल’ पद्धतीचा अवलंब करीत काही निवडक वारकर्‍यांना परवानगी देण्यात यावी, या मागणीसाठी वारकरी शिष्टमंडळाने आज विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. वारीचा कालावधी, संख्येवरील निर्बंधांसह मार्गावरील सर्व गावांचा ठराव असे अनेक प्रस्ताव शिष्टमंडळाने फडणवीस यांना दिले आहेत. याबाबत आपण मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले आहे.

पंढरीच्या आषाढी पायवारीसाठी ‘बायो-बबल’ पद्धतीचा अवलंब करीत काही निवडक वारकर्‍यांना परवानगी देण्यात यावी, अशी मागणी वारकरी शिष्टमंडळाने मांडली

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कोव्हिड-19 च्या नियमांचे पालन करत पायवारी करता यावी, तसेच शेकडो वर्षांच्या गौरवशाली परंपरेत खंड पडू नये, असा अतिशय व्यवहार्य प्रस्ताव वारकरी शिष्टमंडळाने मांडला आहे. त्यामुळे यासंदर्भात मी स्वत: मुख्यमंत्र्यांकडे याबाबत पाठपुरावा करेन.विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य शिवाजी महाराज मोरे, संत तुकाराम महाराज संस्थान देहूचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे, विश्वस्त माणिक महाराज मोरे, अध्यात्मिक समन्वय आघाडीचे अध्यक्ष आचार्य तुषार भोसले, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे भाऊ महाराज फुरसुंगीकर, संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्याचे संजय महाराज धोंडगे, वारकरी संघटनांचे प्रतिनिधी रमेश महाराज वाघ, विकास घांग्रेकर यांच्यासह वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी या भेटीवेळी उपस्थित होते.

अनेक वर्षाची या वारीला परंपरा आहे, राज्यात कोरोना संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेत पुढील पंधरा दिवसातील कोरोना स्थिती पाहून पुन्हा वारकरी संप्रदायातील मान्यवरांशी चर्चा करुन आणि विश्वासात घेवूनच अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे