नाना पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त शिंदखेडा तालुका काँग्रेसच्या वतीने शिंदखेडा तालुक्यात सोडियम हायड्रोक्लोराईट चे वाटप.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त शिंदखेडा तालुक्यातील सर्व गावांना (प्रति गावासं २५लि.) तालुका काँग्रेसच्या वतीने जिल्हा काॅग्रेस अध्यक्ष शाम दादा सनेर यांच्या हस्ते सोडियम हायड्रोक्लोराईट चे वाटप.

शिंदखेडा(धुळे) प्रतिनिधी || महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त शिंदखेडा तालुका काँग्रेसच्या वतीने शिंदखेडा तालुक्यातील सर्व गावे (प्रति गावास २५ लि) गावांना व शिंदखेडा नगरपंचायत , दोंडाईचा नगरपालिका या प्रमाणे एकुण ५ हजार लि. सर्वाना सोडियम हायड्रोक्लोराईट फवारणी करण्यासाठी वाटप करण्यात आले , सद्या कोविड-१९ आजाराने ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात प्रसार होत आहे ,व शासनाने तिसऱ्या लाटेचे देखील आशंका व्यक्त केली आहे, त्या पाश्र्वभूमीवर तालुका काँग्रेसच्या वतीने विधानसभा क्षेत्रातील सर्व गावांना सोडियम हायड्रोक्लोराईट चे वाटप आज जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष शाम दादा सनेर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले यावेळी तालुकाध्यक्ष रावसाहेब पवार, जि.प.सदस्य हेमराज बागुल, संचालक प्रकाश पाटील,प.स.सदस्य राजेंद्र देवरे, नगरसेवक सुनिल चौधरी, मा.सभापती शामकांत सोनवणे, नरेंद्र पाटील, उपसरपंच आबा मुंडे, लोहगाव चे सरपंच महेंद्र पाटील, जिभाऊ माळी,पंकज सोनवणे, पांडुरंग माळी,कमखेडा सरपंच उमेश पवार ,भाईदास शेठ बडगुजर, संजय माळी, परिक्षित देशमुख,धनराज देसले,वरुड चे उपसरपंच राकेश राजपूत,वरसुस उपसरपंच सचिन पवार,पंकज निकम, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष कुलदीप निकम,मुकेश जाधव,सागर पवार,नंदू पवार, वकिल ठाकरे, अक्षय पाटील, रामकृष्ण पाटील, अतुल पाटील, कैलास आखाडे, विलास गोसावी, पदाधिकारी व सरपंच उपस्थित होते.



