आपल खान्देशमहाराष्ट्र

बदलापूरचे गणपती बाप्पा निघाले परदेशवारीला !

बदलापूर : बदलापूरचे गणपती बाप्पा यंदा कोरोनाची  चेन ब्रेक करत थेट अमेरिकेच्या वारीला निघाले आहेत. बदलापूरच्या चिंतामणी क्रिएशन्समधून २ हजार गणेशमूर्ती अमेरिकेला रवाना झाल्या आहेत.

बदलापूरचे गणपती बाप्पा यंदा कोरोनाची चेन ब्रेक करत थेट अमेरिकेच्या वारीला निघाले आहेत. बदलापूरच्या चिंतामणी क्रिएशन्समधून २ हजार गणेशमूर्ती अमेरिकेला रवाना झाल्या आहेत.

बदलापुरातील निमेश जनवाड हा तरुण गेल्या काही वर्षांपासून गणेशमूर्ती तयार करून परदेशात पाठवण्याचं काम करतो. त्याच्या गणेशमूर्तींना अमेरिकेसह आखाती देश, ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये मोठी मागणी आहे. बदलापूरहून अमेरिकेच्या वारीला निघालेल्या २ हजार बाप्पांची पहिली कन्साईनमेंट नुकतीच रवाना झाली.

निमेश याचं गणेशमूर्ती निर्यातीचं हे सहावे वर्ष आहे. २०१९ साली निमेश याने साडेतीन हजार गणेशमूर्ती परदेशात पाठवल्या होत्या. तर मागील वर्षी निर्यात बंद असल्यानं त्याला तब्बल ४० लाख रुपयांचा फटका बसला होता.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे