पाचोरा Live 24- पाचोरा शहरात अतिक्रमना विरोधात धडक करावाई
पाचोरा, प्रतिनिधी । पाचोरा नगरपरिषदेर्फे शहरातील मुख्य रस्त्यांवर अतिक्रमण करून रहदारीस अडथळा ठरणाऱ्या हातगाडी, फेरीवाले, टपरीधारक यांच्यावर मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने कारवाई करत हातगाड्या जप्त केल्यात.
सार्वजनिक रस्त्यावरील हातगाडया लावल्यास त्यांचेवर कायदेशीर कारवाई करुन हातगाडया जप्त करण्यात येतील.
-शोभा बाविस्कर मुख्यधिकारी पाचोरा
स्टेशनरोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, जामनेर रोड, बस स्टॅड रोड, रेल्वे भुयारी मार्ग परिसर, नगरपालिका जिन या भागात सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण केलेल्या हातगाडी, फेरिवाले, रस्त्यावर बसून विक्री करणारे, टपरीधारक यांच्यामुळे खरेदीसाठी येणारे नागरीक, व्यापारी यांची वाहने मुख्य सार्वजनिक रस्त्यातच लावण्यात येत होत्या. यामुळे शहरातील रहदारीस मोठया प्रमाणात अडथळा निर्माण होऊन, मोठी वाहने, ॲम्बुलन्स, विविध शासकिय विभागांची वाहने यांना अडचण निर्माण होऊन वाहनांचा धक्का लागून किरकोळ वाद निर्माण होणे, मोठया प्रमाणावर गर्दी जमा होऊन कोविड – १९ महामारी प्रादुर्भाव मोठया प्रमाणात वाढविण्याची दाट शक्यता नाकारता येत नसल्याने नागरिकांच्या तक्रारी देखील वारंवार प्राप्त होत होत्या. यावर नियंत्रण मिळावे म्हणून आज शुक्रवार दि. ४ जुन रोजी मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने धडक कारवाई अतिक्रमण केलेल्या हातगाडी, फेरिवाले यांचे अतिक्रमण काढण्यात आले. यात हातगाडया जप्त करण्यात आल्यात. काही नागरिकांनी स्वत:हुन त्यांचे नुकसान होऊन नये म्हणून आपले अतिक्रमण काढून घेतले. सदरच्या अतिक्रमणधारकांना रावल जिन व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळया जवळुन जाणारा डी. पी. रोड येथे पर्यायी जागा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. यापुढे देखील त्यांनी याच जागेवर आपल्या हातगाडी लावाव्यात. सार्वजनिक रस्त्यावरील हातगाडया लावल्यास त्यांचेवर कायदेशीर कारवाई करुन हातगाडया जप्त करण्यात येतील. यावेळी कुणीही सार्वजनीक रहीदारीस अडथळा निर्माण होईल असे अतिक्रमण करु नये असे केल्यास कुणाचीही गय केली जाणार नसल्याचे मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांनी सांगितले. त्याच प्रमाणे नागरीकांनी शासनाने कोरोना विषाणू महामारीच्या पार्श्वभुमवर ठरवून दिलेल्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन करत अन्यथा दंडात्मक कार्यवाही केली जाईल असा इशारा देखील मुख्याधिकारी बाविस्कर यांनी दिला



