आपल खान्देशमहाराष्ट्र
मोठी बातमी..महाराष्ट्रातील तब्बल १८ जिल्हे उद्यापासून अनलॉक, तुमच्या जिल्ह्यात काय परिस्थिती ?
राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज पत्रकार परिषद घेत महाराष्ट्रातील अनलॉक विषयी माहिती दिली. महाराष्ट्रात 5 टप्प्यात अनलॉक करण्यात येणार आहे. अनलॉक साठी कोरोनाची अॅक्टिव्ह रुग्णसंख्या आणि कार्यरत ऑक्सिजन बेडची स्थिती यावरुन पाच टप्पे ठरवण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यात 18 जिल्ह्यांमध्ये अनलॉक करण्यात येणार आहे.. या जिल्ह्यातील लॉकडाऊन पूर्णपणे हटवण्यात आला आहे.
खाली उल्लेखलेल्या 18 जिल्ह्यात आता दुकानं, हॉटेल, सिनेमागृह, वाहतूक सर्व काही सुरु होईल, अशी माहिती वडेट्टीवार यांनी दिली. दुसऱ्या टप्प्यात जे जिल्हे आहेत, त्या जिल्ह्यात 50 टक्के अनलॉक असेल. महत्त्वाचं म्हणजे मुंबई दुसऱ्या टप्प्यात असल्याने मुंबई लॉकडाऊन शिथील होणार नाही. तसंच मुंबई लोकलबातच्या निर्णयात तूर्तास कोणतेही बदल करण्यात आले नाहीत.
लॉकडाऊन शिथील करण्यासाठी 5 लेव्हल ठरवल्या आहेत. ज्या जिल्ह्यात पॉझिटिव्हिटी रेट 5 टक्के आहे आणि ऑक्सिजन बेड 25 टक्क्याच्या आत व्यापलेले असेल, तिथे सर्व गोष्टी सुरु होतील.
-विजय वड्डेटीवार.
अनलॉकनंतर काय सुरु राहणार?
रेस्टॉरंट, माल्स, गार्डन, वॉकिंग ट्रेक सुरू होतील, खाजगी, सरकारी कार्यालये 100 टक्के सुरू होतील, थिएटर सुरू होतील, चित्रपट शुटिंगला परवानगी, सार्वजनिक कार्यक्रम, लग्न सोहळा यांना 100 टक्के सूट दिली आहे. ई कॉमर्स सुरू राहिल, पहिल्या टप्प्यात जमावबंदी राहणार नाही. जिम, सलून सुरू राहणार आहे. बस 100 टक्के क्षमतेने सुरु होतील. इतर राज्यातून येणाऱ्यांवर काही निर्बंध असतील, त्याबाबतचे आदेश नंतर काढले जातील, आंतरजिल्हा प्रवास मुभा राहिल, अशीही माहिती वडेट्टीवार यांनी दिली. पहिल्या लेव्हलमध्ये हे सगळं सुरू असणार आहे
अनलॉक कोणत्या टप्प्यात होणार
- पहिल्या टप्प्यात 18 जिल्हे
- दुसर्या टप्प्यात 5 जिल्हे
- तिसरा 10 जिल्हे
- चौथ्या टप्प्यात 2 जिल्हे
पहिल्या लेवलमधील जिल्हे
औरंगाबाद, भंडारा, बुलढाणा ,चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, नाशिक, परभणी, ठाणे , वर्धा, वाशिम, यवतमाळ
दुसऱ्या लेव्हलमधील जिल्हे
अहमदनगर, अमरावती, हिंगोली, मुंबई, मुंबई उपनगर, नंदुरबार,
तिसऱ्या लेव्हलमधील जिल्हे
अकोला, बीड, पालघर, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, उस्मानाबाद, कोल्हापूर
चौथ्या लेव्हलमधील जिल्हे
पुणे, रायगड
लॉकडाऊन शिथील करण्यासाठी 5 लेव्हल ठरवल्या आहेत. ज्या जिल्ह्यात पॉझिटिव्हिटी रेट 5 टक्के आहे आणि ऑक्सिजन बेड 25 टक्क्याच्या आत व्यापलेले असेल, तिथे सर्व गोष्टी सुरु होतील.
विजय वड्डेटीवार




