महाराष्ट्र

“रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी निधी कमी पडू देणार नाही, मात्र…” मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला इशारा

मुंबई : राज्यातील अनेक राष्ट्रीय व राज्य महामार्गांची सध्या अत्यंत दुरवस्था झाली आहे, या महामार्गावरील खड्ड्यांच्या दुरुस्ती व उपाययोजनांचा नुकताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी आयोजित बैठकीत आढावा घेतला

दरम्यान राज्यातील रस्त्यांची कामे दर्जेदार करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यासोबतच या कामांसाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री यांनी दिले. यावेळी त्यांक रस्त्यांच्या कामांसाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करुन दिला जाईल, मात्र निधीचा विनियोग योग्यप्रकारे न करणाऱ्या आणि गुणवत्ता न राखणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला.

या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, उद्योगमंत्री सुभाष देसाई, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे, यांच्यासह कोकण, नाशिक, मराठवाडा, पुणे आदी विभागांचे मुख्य अभियंते, राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे वरिष्ठ अभियंते उपस्थित होते.

राज्यातील सर्व राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्गांच्या सद्यस्थितीचा आढावा घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे रखडलेले काम लवकर मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या, मुंबई-नाशिक महामार्गावरील खड्डे बुजविताना गुणवत्तेवर लक्ष देण्याचे निर्देश त्यांनी दिले. सोबतच गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेली रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे