पुणे : महाराष्ट्र राज्याबाहेर देखील कोविशिल्ड लसची मागणी वाढली असता, खाजगी रुग्णालयात जास्त पैशात लस दिली जात आहे त्यामुळे वंचित बहुजन आघाडीने या बाबतीत आवाज उठवला आहे. आज पुण्यात 100 रुपयात लस उपलब्ध करुन देण्यासाठी आंदोलन करण्यात आलं आहे. सरसकट कोविशिल्ड लस नागरिकांना १०० रुपयात उपलब्ध करून देण्यात यावी म्हणून वंचित बहुजन आघाडी पुणे शहराच्यावतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. ही सदरील माहिती वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत ट्विटर हॅंडल वर दिली आहे.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा