ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकीय

देवेंद्र फडणवीस एकनाथ खडसेंच्या घरी; राजकीय वर्तुळात रंगली चर्चा

 

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीसांनी मुक्ताईनगरमधून आपल्या दौऱ्याला सुरुवात करताना सर्वांना आश्चर्याचा धक्का देत भाजपाला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या एकनाथ खडसेंच्या घरी भेट दिली. एकनाथ खडसे यांनी भाजपा सोडताना देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यामुळे जळगाव दौऱ्यात फडणवीस एकनाथ खडसेंच्या घऱी गेल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या जळगाव दौऱ्यादरम्यान त्यांनी मुक्ताईनगरमध्ये खडसेंच्या घरी जाण्याबाबत चर्चा होण्याचं आणखी एक कारण आहे. ते म्हणजे फडणवीस यांनी सोमवारी शरद पवारांच्या सिलव्हर ओक या निवासस्थानी जात त्यांची भेट घेतली होती.

देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसेंच्या कोथळी येथील घरी सदिच्छा भेट देत एकनाथ खडसेंच्या सून तथा भाजपा खासदार रक्षा खडसे यांच्यासह इतर भाजपा पदाधिकाऱ्यांची भेट घेतली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे