आपल खान्देश

जळगाव जिल्ह्यात ७१ हजार लशी उपलब्ध; थांबलेले लसीकरण उद्यापासून

जळगाव : जिल्हयात ४५ वर्षावरील नागरिकांसाठी ७१ हजार लशींचा (co vaccine) पुरवठा झाला आहे. उद्यापासून (ता.६) जिल्ह्यात नागरिकांना लसी उपलब्ध होतील. दरम्यान गेल्या चार दिवसात १८ ते ४४ वयोगटातील जिल्ह्यातील २ हजार ८४१ नागरीकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. लसीकरणासाठी या वयोगटातील नागरीकांनी कोविन ॲपवर  नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे. उपलब्ध लशीमध्ये ५६ हजार ६०० कोविशिल्ड तर १४ हजार ५०० कोव्हॅक्सीन लसी आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे विविध उपाययोजना राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात १६ जानेवारीस कोरोना लसीकरणाचा जिल्हास्तरीय शुभारंभ झाला. पहिल्या सत्रात आरोग्य सेवकांचे लसीकरण सुरु केले. त्यानंतर ५ फेब्रुवारीपासून फ्रंटलाईन वर्कर्स आणि ४५ वर्षावरील कोमॉर्बिड व्यक्ती व ज्येष्ठ नागरीकांचे लसीकरण सुरु करण्यात आले होते. तर १ एप्रिलपासून जिल्ह्यातील ४५ वर्षावरील सर्व नागरीकांचे लसीकरण सुरु करण्यात आले असून लसीच्या उपलब्धतेनुसार जिल्हा रुग्णालय, उप जिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रासह काही खाजगी रुग्णालयात नागरीकांना कोरोनाची लस देण्यात येत आहे.

कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी लस महत्वपूर्ण असल्याने राज्य शासनाने १ मे पासून राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील सर्व नागरीकांचे मोफत लसीकरणाचा निर्णय घेतला आहे. जळगाव जिल्ह्यात कोविन ॲपवर नोंदणी केलेल्या नागरीकांसाठी जिल्ह्यात रेडक्रॉस सोसायटी, रोटरी भवन, जळगाव शहर महानगरपालिकेचे शाहू महाराज रुग्णालय व नानीबाई आरोग्य केंद्र आणि प्राथमिक आरोग्य केंद्र, नशिराबाद अशी एकूण पाच केंद्र सुरु केली आहेत. १८ ते ४४ वयोगटात मर्यादित स्वरूपात व फक्त आगाऊ ऑनलाइन नोंदणीद्वारे लसीकरण सुरू आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे